शेतकऱ्यांसाठी सोपे मार्गदर्शक

अचूक शेतीबद्दल नवीन आहात?
इथून सुरुवात करा.

अचूक शेती म्हणजे मोठ्या शेतांसाठीचे काही गुंतागुंतीचे तंत्रज्ञान नाही. याचा साधा अर्थ म्हणजे अंदाजाऐवजी आपल्या शेतातील प्रत्यक्ष डेटाच्या आधारे पाणी, रोग-कीड आणि खत व्यवस्थापनाबाबत अधिक योग्य आणि स्मार्ट निर्णय घेणे.

खरे वास्तव

जवळपास 80% शेतकऱ्यांना त्यांच्या क्षमतेएवढे पीक मिळत नाही.

ते पुरेशी मेहनत करत नाहीत म्हणून नाही. तर कारण शेती आता अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे — आणि हवामान बदलामुळे ती दरवर्षी अधिकच कठीण होत चालली आहे.

हंगामाचे यश किंवा अपयश ठरवणारे निर्णय — जसे की कधी पाणी द्यायचे, काय फवारणी करायची, कोणते अन्नद्रव्य द्यायचे — यासाठी अशा डेटाची गरज असते जो बहुतांश शेतकऱ्यांकडे नसतो.

80%

मी जास्त पाणी दिले की कमी?

गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास मातीचा pH आणि क्षारांचे प्रमाण वाढते. कमी पाणी दिल्यास पिकाला क्रिटिकल स्टेजमध्ये ताण बसतो. मातीच्या डेटाशिवाय तुम्ही फक्त अंदाज लावत आहात.

रोग अचानक कसे काय उद्भवले?

तुम्हाला लक्षणे दिसू लागतात, तोपर्यंत रोग पिकात पूर्णपणे पसरलेला असतो. त्यासाठी कारणीभूत परिस्थिती 48 तास आधीच निर्माण झालेली असते.

मी कालच फवारणी केली. नंतर पाऊस पडला.

फवारणीची चुकीची वेळ म्हणजे औषधांचा अपव्यय आणि पिकाचे नुकसान. हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे नेहमीच्या वेळापत्रकानुसार फवारणी करणे आता चुकीचे ठरत आहे.

फायलो तुमचा मार्गदर्शक

आम्ही 6 वर्षे प्रत्यक्ष शेतात घालवली आहेत.
त्यामुळे आम्ही तुमच्या समस्या जाणतो.

आम्ही भारतभरातील हजारो शेतांमध्ये, पावसात आणि कडक उन्हात फिरलो आहोत. आम्हाला माहित आहे की एका चुकीच्या आठवड्यातील एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण हंगामाची मेहनत वाया जाऊ शकते. म्हणूनच आम्ही फायलो बनवले — फक्त एक डेटा दाखवणारे साधन म्हणून नाही, तर एक विश्वासू कृषी सल्लागार म्हणून.

01 — हे काय आहे

जुनी सवय सोडून, अचूक माहितीच्या आधारे शेती करा.

पारंपारिक शेतीमध्ये आपण एकच ठरलेली पद्धत वापरतो: दर 3 दिवसांनी पाणी देणे, दर 2 आठवड्यांनी फवारणी करणे, दर महिन्याच्या सुरुवातीला खत देणे. हे वेळापत्रक आपल्या आधीच्या पिढ्यांनी अनेक वर्षांच्या हवामानाच्या अनुभवावरून तयार केले होते.

पण अचूक शेती वेगळी आहे. केवळ दिनदर्शिका (कॅलेंडर) न पाहता, तुमच्या शेताला या क्षणी नेमकी कशाची गरज आहे, त्यानुसार तुम्ही काम करता.

अचूक शेतीसाठी दोन गोष्टींची गरज असते: तुमच्या शेतात काय चालले आहे हे मोजणारे सेन्सर्स आणि या नोंदींचा नेमका अर्थ काय आहे हे सांगणारे स्मार्ट सॉफ्टवेअर (AI).

असा विचार करा

"कल्पना करा, तुम्ही अशा डॉक्टरांकडे जाता जे तुमची तपासणी न करता प्रत्येक वेळी तेच औषध देतात. ही झाली पारंपरिक, ठराविक वेळापत्रकावर आधारित शेती. आता अशा डॉक्टरांची कल्पना करा जे उपचार करण्यापूर्वी तुमचा रक्तदाब, ताप आणि इतर तपासण्या करतात. ही म्हणजे अचूक शेती, जिथे ‘रुग्ण’ तुमची माती आणि पीक असते, आणि निर्णय अंदाजावर नव्हे तर प्रत्यक्ष माहितीच्या आधारे घेतले जातात."

कॅलेंडर आधारित शेती

"शेवटचे पाणी देऊन 3 दिवस झाले, म्हणून आज पाणी देणे."

माहितीवर (डेटा) आधारित शेती

"आज पिकाच्या मुळांशी असलेला ओलावा (soil moisture) गरजेपेक्षा कमी झाला आहे, म्हणून पाणी देणे."

परिणाम

पाणी आणि औषधांची बचत. कमी नुकसान. जास्त उत्पादन. प्रत्येक हंगामात.

02 — याची आत्ताच काय गरज आहे

तुमच्या वडिलांनी ज्या हवामानात शेती केली,
ते हवामान आता राहिलेलं नाही.

पारंपरिक शेतीचे कॅलेंडर त्या काळात तयार झाले होते, जेव्हा ऋतू आणि हवामानाचा अंदाज तुलनेने निश्चित असायचा. पण आज ही निश्चितता झपाट्याने बदलत आहे. फायलोच्या सेन्सर्सनी अवघ्या तीन वर्षांत हवामानातील आणि शेतातील परिस्थितीतील मोठे बदल नोंदवले आहेत.

3 पटीनेअवेळी पाऊस

आधी ज्या कोरड्या महिन्यांत पाऊस पडत नव्हता, तिथे आता मुसळधार पाऊस पडतो

6 आठवडेरोगांचा लवकर प्रादुर्भाव

डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगांचे धोके कॅलेंडरमध्ये अपेक्षित असलेल्या वेळेच्या आधीच दिसू लागतात.

💡तुम्हाला तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या हवामान अंदाजाची गरज नाही. अचूक शेती थेट तुमच्या शेतावर लक्ष ठेवते आणि आजच्या परिस्थितीचा तुमच्या पिकावर काय परिणाम होईल ते सांगते.
पाऊस अनपेक्षित झाला आहे

पाऊस अचानक आणि मुसळधार येतो — कधीकधी अपेक्षेपेक्षा 3 पटीने जास्त. त्यामुळे गेल्या वर्षीचे वेळापत्रक वापरल्यास या वर्षी कमी किंवा जास्त पाणी पडू शकते.

रोग लवकर येतात

हिवाळ्यात कमी थंडी असल्याने बुरशी आणि कीड काही आठवडे आधीच वाढू लागते. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार फवारणी करेपर्यंत रोग आधीच पसरलेला असतो.

तापमानात मोठे चढ-उतार

अति उष्णता आणि अचानक आलेली थंडी पिकांवर असा ताण आणतात जो पूर्वी कधीही पाहिला नव्हता. ठरलेले जुने वेळापत्रक या अचानक होणाऱ्या बदलांना तोंड देऊ शकत नाही.

03 — हे कसं काम करतं

जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही, ते हे मोजते.

शेतातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत. फायलो त्या अचूकपणे — अगदी ऑटोमॅटिकली — मोजते आणि थेट तुमच्या फोनवर पाठवते.

सेन्सर पासून ते थेट तुमच्या फोनपर्यंत
Fyllo Kairo weather station displaying all 12 monitored parameters including wind and leaf wetness
सेन्सर काय मोजतो

उन्हाची तीव्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा, पाऊस, हवेचे तापमान आणि दमटपणा (humidity), हवेचा दाब, पानांवरील ओलावा, 2 पातळ्यांवरील जमिनीतील ओलावा (soil moisture), जमिनीचे तापमान

Fyllo AI engine computing farm-specific recommendations using INSAT satellite data
AI विश्लेषण करते

पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार याचे विश्लेषण केले जाते. AI शेतातील रिअल-टाइम सेन्सर डेटा आणि मागील हवामानाचा अभ्यास करून रोगांचा अंदाज लावते, तसेच अचूक पाणी आणि खतांची गरज मोजते.

Fyllo smartphone app interface displaying actionable color-coded irrigation and disease alerts
तुम्हाला अलर्ट मिळतो

"आता पाणी द्या",
"आज फवारणी करा"

पारंपारिक शेती
  • वरची माती कोरडी दिसली की पाणी देणे
  • ठरलेल्या दिवसांनंतर फवारणी करणे
  • सांगितलेले खत डोळे झाकून देणे
  • रोग पसरल्यानंतर उपाय करणे
फायलो अचूक शेती
  • मुळांपाशी ओलावा कमी झाला की पाणी देणे
  • रोगासाठी पोषक वातावरण तयार झाल्यावरच फवारणी करणे
  • पिकाला गरज असेल त्याच वेळी खते देणे
  • रोग येण्यापूर्वी 48 तास आधीच इशारा मिळणे
04 — छोटे शेत

खरं तर, याचा सर्वात जास्त फायदा छोट्या शेतकऱ्यांना होतो.

बऱ्याच जणांना वाटते की 'अचूक शेती' (precision farming) केवळ अमेरिकेतील 500 एकरच्या मोठ्या शेतीसाठीच आहे. फायलो तसे नाही. आम्ही 2 ते 5 एकर क्षेत्रात मौल्यवान पिके घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना मदत करतो.

2 एकरात चुकलेली एक फवारणी ₹50,000 चे नुकसान करू शकते. हा पैशांचा तोटा 20 एकरच्या शेताइतकाच आहे — पण तुमच्या उत्पन्नाचा विचार करता हे खूप मोठे नुकसान आहे.

₹8,999*

हार्डवेअर चा खर्च. शेतकरी एकाच हंगामात हा खर्च वसूल करतात.

90%

दरवर्षी नूतनीकरण (renew) करतात. हे याचे काम उत्तम चालल्याचे थेट पुरावा आहे.

15,000+

भारतातील 15,000 हून अधिक शेतकरी, ज्यांच्याकडे मुख्यतः 5 एकरापेक्षा कमी जमीन आहे.

05 — प्रत्यक्ष मिळालेले परिणाम

खऱ्या शेतांतून मिळालेले थेट परिणाम.

हे फायलो वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे सरासरी आकडे आहेत — जे संशोधन केंद्रातील चाचण्यांवरून नाही, तर प्रत्यक्ष शेतातील डेटावरून नोंदवले आहेत.

25%उत्पादनात वाढ
33%पाण्याची बचत
25%खर्चात घट
अधिक जाणून घ्यायला तयार आहात का?

निरो इन्फिनिटी

अचूक पाणी नियोजनासाठी जमिनीतील ओलाव्यावर आधारित मातीचे मॉडेलिंग.

फायलो कायरो स्टेशन

पिकांवर रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच संभाव्य प्रादुर्भावाची माहिती देणारी यंत्रणा.

अचूक शेती विरुद्ध पारंपारिक शेती

दोन्हींचा खर्च, उत्पादन, पाण्याची बचत आणि रोग व्यवस्थापनाची सविस्तर तुलना.

द्राक्ष शेती उपाय

बेरी कॅकिंग, डाउनी आणि अचूक सिंचनाचा अंदाज देणारे द्राक्ष बागेसाठीचे खास उपाय.

डाळिंब

तेल्या रोग (bacterial blight) नियंत्रण, फळ कॅकिंग (fruit cracking) रोखणे आणि बहार व्यवस्थापन (Bahar management) साठी स्मार्ट शेती उपाय.

मिरची शेती उपाय

मिरची पिकासाठी रोगांचा अंदाज, थ्रिप्स आणि कोळी (thrips & mites) चा अंदाज आणि अचूक फवारणीची वेळ.

प्लॅटफॉर्म मार्गदर्शिका

सेन्सरची अचूकता, प्रादेशिक सेवा आणि किमतीची तुलना करणारी ग्राहकांसाठी सोपी मार्गदर्शिका.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

अजिबात नाही. मौल्यवान पिके घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होतो, कारण त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा नफ्यावर मोठा परिणाम होतो. हे सर्वांना परवडणारे व्हावे यासाठी फायलो ची किंमत ₹8,999* पासून सुरू होते.

नाही. तुम्ही फक्त डिव्हाइस बसवा, ॲप सुरू करा आणि सोपे अलर्ट्स मिळवा, जसे की 'आता पाणी द्या' किंवा 'आज फवारणी करा'. धरती AI तुम्हाला सर्व काही तुमच्या स्वतःच्या भाषेत समजावून सांगते.

त्याची काहीच गरज नाही. फायलो डिव्हाइसेस मध्ये इन-बिल्ट eSIM असते, जे थेट मोबाईल नेटवर्कशी जोडले जाते. कोणतीही वायर किंवा इंटरनेट सेटअपची गरज नाही. साधे नेटवर्क असलेल्या कोणत्याही ठिकाणी हे काम करते.

बहुतेक शेतकरी एकाच हंगामात हा खर्च वसूल करतात. फवारणीमध्ये ₹15,000 आणि खतांमध्ये ₹8,000 ची बचत झाल्यास ही गुंतवणूक एकाच हंगामात वसूल होते.

फायलो द्राक्ष, डाळिंब, लिंबूवर्गीय (citrus), टोमॅटो आणि इतर 35 हून अधिक पिकांना सपोर्ट करते. यातील सल्ल्याचे मॉडेल्स तुमच्या पिकाच्या जातीनुसार आणि वाढीच्या टप्प्यानुसार काम करतात.

अंदाजावर नव्हे, माहितीच्या आधारे शेती करा. फायलो ने सुरुवात करा.

निरो इन्फिनिटी अवघ्या काही तासांत बसवले जाते. लगेच डेटा मिळायला सुरुवात होते आणि त्याच दिवसापासून शेतीसाठी मार्गदर्शनही मिळू लागते.